बारामती येथे खासगी विमान अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

0
73

बारामती | प्रतिनिधी
बारामती येथे झालेल्या भीषण खासगी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लँडिंगच्या वेळी विमानाचा तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

अपघातानंतर अजित पवार यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकाने तात्काळ धाव घेतली. विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदलामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here