फोंडाघाट – जिल्हयातील व्यापाऱ्याच्या दृष्टीने मोठी बाजारपेठ म्हणून फोंडाघाट बाजारपेठ कडे पाहिले जाते. ब्रिटिश कालीन असलेली ही बाजारपेठ ‘मध’ आणि ‘पान’ बाजारामुळे जिल्ह्यात प्रसिद्ध. मात्र या महाकाय बाजारपेठ असलेल्या गावाला जणू कोणाची तरी नजर लागली, आणि आज होत्याचे न्हवते झाले अशी म्हणायची वेळ आज फोंडाघाट बाजारपेठे कडे पाहून वाटू लागले.मोठी रेलचेल, घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांची असणारी घोडदौड आणि या सगळ्याला पाठिंबा देणारा पंचक्रोशीतील ग्राहक वर्ग यामुळे हे नटलेल फोंडा गाव. मात्र आज कोरोनाच्या विळख्यात जखडल गेलं. आणि एक उजाड आणि भकास बाजारपेठ आज पाहायला मिळते. कोरोनाच्या काळात अगदी धडाडीने या गावातील योध्यांनी यात हेल्प अकॅडमी, आर.के. ग्रुप, पंचम ग्रुप, शिवसाम्राज्य प्रतिष्ठाण यासारख्या ग्रुप मधील तरुणांनी जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत कोरोना योध्या प्रमाणे लढले. मात्र त्याला साथ होती येथील आरोग्य यंत्रणेची. मात्र आज ही परिस्थिती बदलत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव एव्हडा वाढला की यात आरोग्य यंत्रणाच आता व्हेंटिलेटरवर आहे. अस म्हणावं लागेल मागील दहा दिवसांत या फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत सक्रिय रुग्णांचा आकडा वाढतच आहे.आणि आज अखेर एकूण रुग्ण संख्या (सक्रिय) १११ वर जाऊन पोहचली. मात्र वाढत असलेल्या प्रदूर्भावाच्या विळख्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत तर ज्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न केले, त्या ग्रामपंचायतीच्या विस्तार अधिकाऱ्यांपासून ते अगदी रुग्णालयाच्या कर्मचाऱयांपर्यंत कोणीही चुकलेला नाही.सध्या गावातील रुग्ण सेवा देणाऱ्या काही खाजगी रुग्णालयाचा विळखा तर आहेच.त्यात काही डॉकटर पोजिटिव्ह आले तर काहीनी सुरक्षेच्या दृष्टीने दवाखाने बंद ठेवले. सध्या गावाचा विचार करता कोरोना मुळे अन्य आजारासाठी देखील खाजगी रुग्णालयाचे दरवाजे बंद झाले आहेत. विशेष म्हणजे सरकारी आरोग्य सेवा देणारी सेवा देखील अंशतः बंद होत चालली आहे. कोरोना ची लागण देखील या रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना झाल्यामुळे सद्या आरोग्य च्या बाबतीत फोंडाघाट तसेच पंचक्रोशी चे तीन तेरा झालेले आहेत.असच म्हणावं लागेल.
*प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज*
सुमारे १५०००च्या आसपास लोकवस्ती असणाऱ्या गावात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या रुग्ण वाढीची दखल प्रशासनाने घेण्याची गरज आहे.सध्या बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी जरी एकजूट दाखवली असली तरी आगामी काळात या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पाउले उचलण्याची गरज आहे.सध्या आरोग्य केंद्रातच रुग्ण सापडल्यामुळे बाह्य रुग्ण तपासणी बंद ठेवण्यात आली आहे. तरी देखील तात्काळ रुग्ण सेवा देण्यात येथील अधिकारी सक्षम आहेत.
*वाढता प्रादुर्भाव आणि नियंत्रण साठी अधिकारी व कर्मचारी यांचा अभाव*
सध्या फोंडाघाट माध्ये कोव्हिडं स्वॅब सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. याठिकाणी फोंडाघाट, नांदगाव, कानेडी येथील रुग्ण स्वॅब देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. कर्माचारी यांचा अभाव असल्यामुळे येथीलच स्वॅब दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच त्या ठिकाणी कर्तव्यावर ठेवण्यात येते. शासन निकाशाप्रमाणे ते चुकीचे असले तरी देखील धक्कादायक बाब म्हणजे ते स्वॅब दिलेले कर्मचारी देखील पॉजिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पुरुष तर द्वितीय महिला आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. प्रथम वर्ग अधिकारी डॉ. जंगम यांची स्वॅब कलेक्शन सेंटर येथे नियुक्ती झाली आहे. द्वितीय महिला अधिकारी असल्यामुळे आजूबाजूच्या भागात सापडणाऱ्या सक्रिय रुग्णांच्या तपासणीसाठी जाणे शक्य होत नाही त्यामुळे सक्रिय रुग्णांवर कधी कधी उपचारांचा अभाव जाणवत आहे. त्यासाठी स्वॅब कलेक्शन झाल्यानंतर प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी यांना पुन्हा सक्रिय रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी करावी लागते.अश्या गंभीर परिस्थितीची गंभीर दखल येथील प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनी घेण्याची गरज आहे. तसेच सक्रिय (गृह विलगिकरनात) रुग्ण असणाऱ्या रुग्णांची हेळसांड होऊ नये, त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचाच सल्ला मिळावा. या पद्धतीचे योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी फोंडाघाट पंचक्रोशी मधून होत आहे.