सिंधुदुर्ग – चिपळूण शहर संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. व्यापारी संपले आहेत. शहराचे बहुसंख्य भाग सपाट झाले आहेत. हे शहर आपल्याला नव्याने उभं करायचं आहे. तेव्हा इथे फुकट फिरायला येऊ नका, मदत घेऊन या, असा रोखठोक सल्ला माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस यांनी सत्ताधारी मंत्री, आमदार आणि नेत्यांना दिला. ते चिपळूण येथे बोलत होते.
चिपळूण शहरावर भीषण संकट कोसळले आहे. शहरभर चिखल आणि राड्यारोड्याचे साम्राज्य पसरले आहे. हे शहर पुन्हा उभे करण्यासाठी सर्वात आधी मा. राणे साहेबांनी प्रयत्न केले. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच सर्वात आधी ट्विट हे साडे आठ वाजत आले . शहराला मदत करण्यासाठी दिल्लीतून मदत पाठविण्यात आली. आम्ही गेल्या दोन दिवसांपासून इथे काम करीत आहोत. आमच्या रूपाने राणे साहेबच इथे कार्यरत आहेत, असे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे म्हणाले.
आम्ही गेल्या दोन दिवसांपासून इथे काम करित आहोत. इथे सत्ताधारी पक्षाचे नेते इकडे तिकडे फिरताना दिसतात. त्यानी फुकटच्या सहली करु नयेत, लोकांना मदत करावी, असा सल्ला राणे यांनी दिला. एनडीआरएफचे लोक काम करित आहेत, पण एसडीआरएफ कुठेही दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
निलेश राणे स्वत: मैदानात
गेल्या दोन दिवसांपासून निलेश राणे मदत साहित्य घेउन चिपळूण आणि परिसर पिंजून काढीत आहेत. आज चिपळूण येथील वडनाका पवार आळी तसेच पेठमाप तांबट आळी येथील पूरग्रस्त कुटुंबांना निलेशजी राणे यांच्या माध्यमातून चटई, ब्लॅंकेट व फरसाण, चिवडा, चकली, बिस्किटे, पाणी जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. यावेळी मोठ्या संख्येने पुरग्रस्त बांधव उपस्थित होते.