प्रियोळ येथे महिलांमध्ये शेती व्यवसायाला च्यालना देण्यासाठी सेंद्रिय आळंबी लागवड आणि सेंद्रिय खत तयार करण्याबाबत तांत्रिक कौशल्ये देण्यासाठी रिव्होल्युशनरी गोवन्सने प्रशिक्षण सत्र आयोजित केले. प्रशिक्षणा सत्रादरम्यान सहभागींना ‘स्त्री क्रांती’ उपक्रमाअंतर्गत सेंद्रिय पद्धतीने आळंदी कशी वाढवायचीे आणि स्वतःचे खत कसे तयार करायचे हे शिकवण्यात आले.
शाश्वत शेती पद्धती कशा शिकाव्यात या प्रशिक्षणाला स्थानिक महिलांची चांगली उपस्थिती होती. सत्राचे संचालन आरजी सदस्य गौरेश गावडेे व दिनेश केरकर यांनी केले. महिलांना बाजारपेठेसाठी पिके कशी तयार करावी आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे हे समजावून सांगण्यात आले. नवीन शेतकऱ्यांनी सुविधा कशा मिळवाव्यात यावर देखील भर देण्यात आली.
आरजी बरोबरील संस्थापक, विश्वेश नाईक यांनी या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आणि महिलांसाठी अतिशय माहितीपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. आम्ही आमच्या महिलांना स्वतंत्र आणि स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि समर्थन देऊन त्यांना सक्षम करू शकतो. या सत्रात महिला सक्षमीकरण आणि रोजगार कसा निर्माण करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते असे विश्वेश नाईक म्हणाले.