सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त असतानाही जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोन मधे करण्यात आलाय. माञ सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त असल्यामुळे ग्रीन झोन यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी प्रधान सचिवांना सुचना करणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिलीय.