प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही – नारायण राणे कणकवलीत बोलताना राणेंनी दिली प्रतिक्रिया

0
267

सिंधुदुर्ग – प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाहीय असे मत भाजपा खासदार नारायण राणे यांनी सरनाईक यांच्यावर पडलेल्या ईडीच्या छाप्याबाबत बोलताना व्यक्त केले. तसेच कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणं उचित ठरणार नाही असेही ते म्हणाले.

शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक दाखल झालं आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं कळत आहे. ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेस आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी शोधमोहीम सुरु करण्या आली. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

याबाबत भाजपा खासदार नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी प्रताप सरनाईक हे साधुसंत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here