वाळपई: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घाला, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाअंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नगरपालिका व्यासपीठ, वाळपई बाजार, वाळपई येथे रविवार, १६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी निदर्शनाद्वारे केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग आहे.
.प्रारंभी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा विषय स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनातून पुढील सूर उमटला. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेच्या १०८ कार्यकर्त्यांना नुकतीच अटक केली आहे. पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या अटक केलेल्या सदस्यांवर शाहीनबाग आंदोलन चिघळणे, आंदोलकांना प्रक्षुब्ध करणे आणि आंदोलनासाठी आर्थिक साहाय्याची जुळवाजुवळ करण्यासाठी सक्रीय असणे, असे आरोप आहेत. पी.एफ्.आयने देशात बंदी घालण्यात आलेली आतंकवादी संघटना सिमीच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचेही अन्वेषणातून समोर आले आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पॉप्युलर फ्रंट इंडिया या संघटनेवर बंदी घालणे आवश्यक आहे. शाहीन बाग येथे १५ डिसेंबर २०१९ पासून धर्मांधाचे धरणे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचे आताचे रूप पाहता विदेशी शक्तींची फूस असणारे साम्यवादी अन् धर्मांध यांनी एकत्र येऊन चालू केलेले हे हिंदूबहुल भारताच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे, अशा संशयाला बळकटी मिळत आहे. पोलिसांनी येथील सर्व आंदोलकांना हुसकावून लावून हा परिसर रिकामा करावा आणि नागरिकांना सामान्य जीवन जगण्यासाठी अनुकूल वातावरण बनवावे, तसेच या आंदोलनात देशविरोधी, समाजविघातक आणि प्रक्षोभक वक्तव्ये करणारे नेते, वक्ते आदींच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आंदोलनात सूत्रसंचालन श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.