पेडणे (प्रतिनिधी) : पेडणे तालुक्यातील कलाकरांसाठी आणि नाट्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास नाट्य कार्यशाळेचे आयोजन पेडणेकर प्रोडक्शनच्या वतीने माऊसवाडा पेडणे येथे दिनांक २ जून २०२४ ते ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत दर रविवारी सकाळी ९.३० ते दु. २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत वय वर्ष ७ ते ४० ह्या वयोगटातील व्यक्ती सहभाग घेऊ शकतात. ह्या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (त्रिपुरा) येथे शिकलेल्या दीप्ती वशिष्ठ या कार्यशाळेच्या प्रशिक्षक म्हणून लाभणार आहेत. तर ह्या कार्यशाळेचा सर्वांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा जेणेकरून अभिनायातले बारकावे, अभिनयाचे तंत्र, नाट्य कलेबद्दल माहिती इत्यादी बाबी शिकण्याची संधी मिळेल, असे आवाहन पेडणेकर प्रोडक्शनचे संचालक सागर पेडणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७९७२६२२०३९/९५२७५०९७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती दिली आहे.