शहराजवळील कात्रज घाटात आज सोमवारी दुपारच्या सुमारास शिवशाही बस दरीत कोसळल्याची घटना घडली. साधारणतः 50 फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे. बसमध्ये 40 ते 50 प्रवासी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पुण्याहून सातार्याच्या दिशेने निघालेली परिवहन महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात पन्नास फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 40 ते 50 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही बस पुणे ते सांगलीच्या दिशेने निघाली होती. कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर शिंदेवाडीजवळ या बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही बस पन्नास फूट खोल दरीत कोसळली. याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.