पालकमंत्र्यांच्या निषेध करत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन

0
249

सिंधुदुर्ग – पालकमंत्री उदय सामंत यांचा निषेध करीत भाजपाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आलेल्या सहा ॲम्ब्यूलन्स पासिंग होउनही अद्याप आरोग्य केंद्रांकडे सोपवण्यात आलेल्या नाहीत. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्घाटनाच्या श्रेयासाठी त्या थांबवून ठेवल्याचा भाजपाचा आरोप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढती आहे. राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू दर जास्त आहे . अशा परिस्थितीत अत्यावश्यक असलेल्या ॲंब्यूलन्स का अडवून धरता असा सवाल करीत भाजपाने पालकमंत्र्यांचा निषेध केला. येत्या दोन दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्रानाॲंब्यूलन्स दिल्या नाहीत तर प्रत्येक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी आंदोलन तीव्र करु असा इशारा भाजपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यानी दिलाय.

राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या निधितून कोविड कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला आत्तापर्यंत 23 नव्या ॲंम्ब्यूलन्स मिळाल्या असल्याचं पालकमंत्र्यांचं म्हणणं आहे . 29 मे ला पालकमंत्री उदय सामंत यानी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आमदार वैभव नाईक यांच्यासोबत 9 ॲंम्ब्यूलन्सचे लोकार्पण केलं होतं. यात खनिकर्म विभागाच्या निधितून आलेल्या 6 ॲंब्यूलन्स होत्या या 9 ॲम्ब्यूलन्स पैकी सहा ॲम्ब्यूलन्स प्राथमिक आरोग्य केंद्राना तर तीन ॲंब्यूलन्स या ग्रामीण रुग्णलयाना देण्यात आल्या. गुरुवारी 3 जूनला खनिकर्म विभागाच्या निधितून आणखी 6 ॲंम्ब्यूलन्स सिंधुदुर्गला आल्या . या ॲंब्यूलन्स आडेली , फणसगाव , तुळस , हेवाळे , मसुरे आणि बांदा या प्राथमिक आरोग्य केंद्राना द्यायच्या आहेत . मात्र पासिंग होउनही अद्याप त्या दिल्या गेल्या नाहीत . उद्घाटनाच्या श्रेयासाठी पालकमंत्र्यानी त्या थांबवून ठेवल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी केलाय .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here