परप्रांतीय कामगाराचा प्रकरणी तेरेखोल नदीपात्रातून मुद्देमाल जप्त

0
290

सिंधुदुर्ग – बांदा-गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगार खुन प्रकरणी बांदा पोलिसांनी शहरातील आळवाडी तेरेखोल नदीपात्रातून खुनात वापरलेले टिकाव शुक्रवारी जप्त केले. गुरुवारी संशयित सुखदेव बारीक याने बांदा पोलिसांना गुंगारा देत दिवसभर खुनात वापरलेले साहित्य शोधण्यासाठी गोव्यात फिरविले होते. मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते.

शुक्रवारी सकाळीच पोलिसांनी खाक्या दाखविताच संशयिताने आपण खुनात वापरलेले टिकाव व रक्ताने माखलेले कपडे आळवाडी येथे तेरेखोल नदिपात्रात टाकल्याची कबुली दिली होती. त्यानुसार सकाळीच बांदा पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. पोलिस कर्मचारी विठोबा सावंत यांनी नदीपात्रात उडी घेत तब्बल अर्धा तास पाण्यात शोधाशोध केली. त्यावेळी नदीत मध्यभागी लोखंडी टिकाव सापडले. कपडे सापडून आले नाहीत त्याचा शोध उशिरापर्यंत सुरु होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here