मडगाव: फातोर्डा युवा शक्तीने आमदार विजय सरदेसाई यांच्या सहकार्याने दिवाळीच्या पूर्वसंध्येला आठवा श्रीकृष्ण विजयोत्सव आयोजित केला आहे. या स्पर्धेतील विजयी पथकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे.
फातोर्डा युवा शक्तीचे पदाधिकारी व नगरसेवक रवींद्र नाईक यांनी शनिवारी या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करून माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत प्रविण नाईक, हर्षद नाईक आणि परेश नाटेकर उपस्थित होते.
रवींद्र नाईक म्हणाले की तरुणांच्या विनंतीनंतर त्यांनी या संदर्भात विजय सरदेसाई यांच्याकडे चर्चा केली आणि त्यानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
“आम्ही कोविड महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यापासून स्वतःला रोखले होते. पण आता इतर कार्यक्रम जोरात चालू आहेत. म्हणून, आम्ही श्रीकृष्ण विजयोत्सव आयोजित करून आपली संस्कृती पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. ” असे रवींद्र नाईक म्हणाले.
“आमच्या तरुणांमध्ये कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्थान निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे. ” असे नाईक म्हणाले.
बक्षिसे अशा स्वरुपातील आहे: श्रीकृष्ण विजयोत्सव स्पर्धा: १) रु १ लाख, २) ७५ हजार, ३) ५० हजार. तसेच १५ हजाराची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे.
उत्कृष्ठ कृष्ण: १) २१ हजार, २) १५ हजार ३) १० हजार.
उत्कृष्ठ संगीत: १) १५ हजार २) १० हजार ३) ५ हजार.
तसेच पारंपारीक नरकारसूर करणाऱ्यांनी १० हजार रुपयांची तीन बक्षिसे दिली जाणार आहे.
स्पर्धेत प्रवेश करणाऱ्या पहिल्या १५ पथकांनी प्रत्येकी ५ हजार रुपये दिली जातील. मात्र, या पंदरातील काही विजेते असल्यास, पुढील प्रवेश करणाऱ्या पथकाला ती रक्कम दिली जाणार आहे.
सर्व पथकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन रवींद्र नाईक यांनी केले आहे.