सिंधुदुर्ग :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा भव्य दिव्य समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेऊन काम करण्याचे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले.आयुक्त डॉ कल्याणकर यांनी दौऱ्याच्या अनुषंगाणे कामकाजाचा आढावा घेतला.
४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा मालवण येथे मुख्य समारंभ पार पडणार आहे. या अनुषंगाने सुरू असलेली कामे आठवड्यात पूर्ण करावीत, चिपी विमानतळ ते मालवण येथील टोपीवाला हायस्कूल रस्त्याचे रुंदीकरण करावे, रस्त्यावर साइन बोर्ड उभारावेत, मैदानाच्या बाजूने असलेली अतिक्रमे हटवावेत,परिसरात स्वछता करावी, पार्किंगची व्यवस्था करावी, राजकोटच्या निर्मितीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावेत, मार्गावर हॅलोजन लाईटचे व्यवस्था करावी असेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी नियोजित राजकोट येथील किल्ल्याच्या कामकाजाची पाहणी केली तसेच तारकर्ली येथील जागेची देखील पाहणी केली.
यावेळी पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रवीण पवार, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित ना्यर,पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल,मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिन जोशी,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी ,विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील , मोटर वाहन निरीक्षक सचिन पालांडे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, तहसीलदार श्रीधर पाटील, अमोल पाठक, वर्षा जाळंदे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.