सिंधुदुर्ग – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीच वरील निल रत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना निलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणात राजकीय वातावरण तापले आहे.
भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे दिले आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या आदीश बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर आता नीलरत्न बंगल्यालावरही कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. दरम्यान, काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निल रत्न बंगला बांधताना सीआरझेड २ चे उल्लंघन झाले अशी तक्रार ऑगस्ट २०२१ ला केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आता या कारवाईमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद वाढणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे वारंवार भाजपा नेते सांगत आहेत. यावरून शिवसेनेनही आपलं शाब्दिक हत्यार बाहेर काढत प्रतित्युर देण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या मुंबई येथील अदिश बंगल्यासंदर्भात झालेल्या चौकशी नंतर आता नीलरत्नचीही चौकशी करण्याचे आदेश आले आहेत. आता पुन्हा एकदा नारायण राणे यांचे पुढचे पाऊल काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे.