नारायण राणे यांना कणकवलीत पोलिसांची नोटीस चौकशी ला हजर राहण्यासाठी दिली नोटीस

0
193

 

सिंधुदुर्ग – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांच्या माध्यमातून कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान ही नोटीस नारायण राणे यांनी स्वीकारली नसल्याने त्यांच्या बंगल्याच्या गेटवर कणकवली पोलीसांकडून ही नोटीस चिटकवण्यात आली. मात्र राणे यांच्या कर्मचाऱ्याने ही नोटीस या ठिकाणाहून काढून टाकली.

एकीकडे नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असतानाच दुसररीकडे पोलीस नितेश राणेंच्या शोधासाठी जंग जंग पछाडत आहेत. त्यातच पत्रकारांनी नितेश राणे कुठे आहेत याबाबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता केंद्रीयमंत्री राणे यांनी नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे काय ? असा प्रतिसवाल पत्रकारांना केला होता. यावरून नितेश राणे कुठे आहेत हे केंद्रीयमंत्री राणेंना माहिती असण्याची गृहीत धरून कणकवली पोलिसांकडून नारायण राणे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here