सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील नांदगावातील अजून बॉक्स वेलच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. नांदगाव तिठा, नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
तसेच प्रवासी निवारा शेड, दिशा दर्शक फलक, योग्य प्रकारे गटार व्यवस्था नसल्याने हायवेजवळील घराघरात अतिवृष्टीमध्ये पाणी घुसणे आदी विषयांवरून नांदगाव ग्रामस्थांचे आज ठीय्या आंदोलन सुरू झाले आहे.
“झालेच पाहीजे झालेच पाहीजे सर्व्हीस रस्ते झालेच पाहीजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्चा खाली करा, हाय हाय सार्व. बांधकाम विभाग हाय हाय, नांदगाव सर्व्हीस रस्त्यांसाठी कोणी वाली आहे का हो वाली” अशा विविध घोषणांनी नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला आहे.
यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर, मजीद बटवाले, गवस साठविलकर , मंगेश पाटील,वृषाली मोरजकर , रेणूका पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील,भाई मोरजकर, अब्दुल नावलेकर ,बाळा मोरये ,करीम बटवाले, इक्बाल बटवाले, श्री .लोके तसेच हायवे बाधीत शेतकरी वर्ग आदी उपस्थित आहेत.
सर्व्हीस रस्त्यांच्या मागणीसाठी मागील वर्षी ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. मात्र जादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस पुरण्यात येण्यापलीकडे काहीच हालचाल झालेली नाही.
तेव्हा सर्व्हीस रस्त्यांसाठी कोणी वाली आहे का ? असा प्रश्न नांदगावच्या सामान्य नागरीकांना पडला असून या सर्व्हीस रस्त्यांअभावी अपघात घडत आहेत.