सिंधुदुर्ग – प्रशासन दडपशाहीने रॅपिड टेस्ट करीत आहेत असा घणाघाती आराेप करीत जामसंडे येथील व्यापाऱ्यांनी रॅपिड टेस्ट माेहिमेला अटकाव केला.सरसकट नागरिकांची रॅपिड टेस्ट करीत असल्यामुळे घबरहाट पसरली असून यामुळे व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे.अशा पध्दतीने रॅपिड टेस्ट माेहिम राबविल्यास विराेध करण्यात येईल असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.व्यापाऱ्यांचा या आक्रमक भुमिकेमुळे जामसंडे बाजारपेठेत वातावरण तंग झाले
तहसिलदार मारूती कांबळे यांनी तात्काळ दखल घेवून घटनास्थळी भेट देवून व्यापाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या सुचनेनुसार नियाेजन करा अशा सुचना प्रशासनाला दिल्या.रॅपिड टेस्टवरून व्यापाèयांनी प्रशासनाला धारेवर धरल्यामुळे जामसंडे येथे वातावरण तंग झाले हाेते या पार्श्वभुमीवर पाेलिस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली हाेती.
जामसंडे एस्टी स्थानक येथे न.पं.मार्फत करण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्ट माेहिमेला जामसंडे येथील व्यापाèयांनी गुरूवारी सकाळी विराेध केला.जामसंडे येथील करण्यात येत असलेली रॅपिड टेस्ट माेहिम ही सरसकट नागरिकांची केली जात आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्यांची टेस्ट करा मात्र अत्यावश्यक कारणासाठी बाजारपेठेत येणाèया नागरिकांना वेठीस धरू नका. केवळ टार्गेट पुर्ण करणेसाठी नागरिकांवर दडपशाही करून टेस्ट करू नका अशी मागणी व्यावसायिक चंद्रशेखर तेली यांनी केली. यावेळी जामसंडे व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रकाश गाेगटे, बंड्या लाड, विलास पाध्ये, बंडू ठुकरूल,विजय पाटील, बाबू लाड, बाळाशेठ नलावडे, अनिकेत पेडणेकर, मंदार लाड आदी व्यापारी उपस्थित हाेते.
नागरिकांचीही सरसकट टेस्ट केली जात असल्याने नागरिकांमध्ये घबरहाट निर्माण झाली असून त्याचा व्यावसायिकांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. केवळ टार्गेट पुर्ण करणेसाठी दहशत माजवुन टेस्ट प्रक्रिया राबवू नका अशी आक्रमक भुमिका घेत अशा पध्दतीने टेस्ट केल्यास व्यापाऱ्यांचा तीव्र विराेध राहील असा इशारा प्रशासनाला दिला. रॅपिड टेस्ट जामसंडे प्रवाशी निवारा शेड अशा बाजुला प्रसाधनगृह व घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी करण्यात येत असून हा नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे असा गंभीर आराेप यावेळी व्यापाऱ्यांनी केला.
केवळ पादचारी व दुचाकीस्वार यांचीच रॅपिड टेस्ट केली जाते व चारचाकी वाहनांवर काेणतीही कारवाई केली जात नाही असा आराेप केला.रॅपिड टेस्ट करण्याची पध्दत याेग्य नाही.भर पावसात महिलांना रांगेत उभे करून रॅपिड टेस्ट करण्यात आली ही एकप्रकारची दडपशाही आहे असा घणाघात यावेळी व्यापाऱ्यांनी केला.सायंकाळी 4 वा.नंतरच टेस्ट माेहिम राबवावी अशी आग्रही मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.नगराध्यक्षा साै.प्रियांका साळसकर यांनीही व्यापाऱ्यांशी चर्चा केली.



