दापोलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे दापोली शहरात डेंग्यू या आजाराने शिरकाव केला आहे. पोलिस वसाहतीतील पाच पोलिस कुटुंबातील व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली आहे
दापोलीतील काही भागांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपंचायतीने शहरातील काही भागांची पाहणी व फवारणी केली आहे. या भागांमध्ये डेंग्यूसदृश आळ्या आहेत का याची पाहणी करण्यात आली. मच्छी मार्केट व परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या आढळून आल्या.
त्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने आरोग्य विभागाकडून डेंग्यू संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याची खंत दापोली नगरपंचायतीचे आरोग्य सभापती मंगेश राजपुरकर यांनी व्यक्त केली.