दशावतारी कलाकारांवर उपासमारीची वेळ, नाट्य प्रयोग नसल्याने उत्पन्नाचे साधंच गेले

0
243

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणातील दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाट्य प्रयोग होऊ शकले नाहीत. बऱ्याच कलाकारांची कुटुंब ही या कलेवर अवलंबून आहेत. त्यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तालुक्‍यातील पन्नासहून अधिक दशावतारी कलाकार हे व्यावसायिक दशावतारी कंपन्यांमध्ये काम करत आहेत. या कलाकारांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ऑनलाईन दशावतारी नाट्य महोत्सव 2020 आयोजन करण्यात आला आहे. एकूण पाच दशावतारी नाट्य युट्युबच्या माध्यमातून लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, अशी माहिती येथील दशावतार कलाकार समिती यांनी दिली आहे.

तालुक्‍यात 50 हून अधिक दशावतार कलाकार व्यावसायिक कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर मार्चपासून सर्वच दशावतारी नाट्य कंपन्या बंद आहेत. बहुतांशी कलाकारांचा उदरनिर्वाह याच कलेवर अवलंबून आहे. सध्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्‍यातील या कलाकारांनी एकत्र येत दशावतार कलाकार समिती दोडामार्ग अशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

प्रत्येक कलाकाराला आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ऑनलाईन दशावतार नाट्य महोत्सव 2020 आयोजित करण्यात आला असून रेणुका वध, शापित तुळशी, चरपटीनाथ, सत्यवान सावित्री आणि मैनाकीनी पाच दशावतारी नाट्य प्रयोग चित्रीकरण करून युट्युबच्या माध्यमातून लवकरच रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचविले जाणार आहेत. याचे लवकरच चित्रीकरण केले जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आले आहे. प्रत्येक कलाकाराला कला सादर करण्याची संधी मिळावी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी हे पाच दशावतारी नाट्य प्रयोग केले जाणार आहेत. दात्यांनी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here