सिंधुदुर्ग – गेल्या वर्षी तिलारी धरण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी धरण परिसरात झालेल्या भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात डोंगर खचून धरणात आले होते त्यामुळे धरणात गडूळ पाणी झाले होते तिलारी धरणाच्या कालव्यात देखील गडूळ पाणी पुरवठा पावसाळा संपला तरी सुरू होता याची पुनरावृत्ती यावेळी झाली आहे.दोन दिवसांपूर्वी तिलारी नदीला आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला होता आता पूर ओसरला मार्ग खुले झाले तरी तिलारी धरणाच्या मुख्य डाव्या कालव्यातून गढूळ पाणी पुरवठा सुरू झाला आहे



