तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ८०.३८ टक्के पाणीसाठा

0
313

 

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र आणि गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण ३५९.५८१०द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध असून, सध्या हे धरण ८०.३८ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात ३३.६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमात एकूण १९६९.२० मि.मी. पाऊस झाला आहे. कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 58.6540 द.ल.घ.मी. म्हणजेच 59.84 टक्के पाणीसाठा आहे. वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पामध्ये 40.7000 द.ल.घ.मी. म्हणजेच 57.88 इतका पाणीसाठा आहे. तर देवगड तालुक्यातील कोर्ले-सातांडी प्रकल्प 100 टक्के भरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here