तारापूर औद्योगिक क्षेत्रात सहा वर्षांत ५८२ अपघात

0
180

 

देशात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात गेल्या सहा वर्षांत ५८२ अपघात झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत अपघातांची संख्या वाढली असून २१ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ७०हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. १५ कामगारांना कायमचे अपंगत्व आले. तारापूर औद्योगिक क्षेत्रात १४००हून अधिक कारखाने आहेत. त्यापैकी ५०१ कारखाने घातक रसायनांचे उत्पादन घेतात. गेल्या काही वर्षांपासून कारखान्यांमध्ये सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याने वांरवार दुर्घटना होत आहेत.

दोन वर्षांतील भीषण अपघात

८ मार्च २०१८- नोवा फेम स्पेशालिटी कंपनीमध्ये स्फोट. चार कामगारांचा मृत्यू. १३ जखमी.

८ सप्टेंबर २०१८- यूपीएलई या कंपनीला ब्रोमीन या रसायनांच्या गळतीमुळे झालेल्या अपघातात चार कामगार गंभीर जखमी. त्यापैकी एका कामगारांचा मृत्यू.

२० जानेवारी २०१९- रामदेव केमिकल्स या कंपनीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू.

२७ जानेवारी २०१९- साळवी केमिकल्समध्ये पेटते सॉल्व्हट पडल्याने सात कामगार जखमी.

१४ मे २०१९- आरती ड्रग्ज या कारखान्यांमध्ये झालेल्या वायूगळतीत ४५ कामगारांना बाधा.

१२ ते २०१९- स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन कारखाना व्यवस्थापकासह तीन कामगारांचा बळी.

२४ मे २०१९- करीगो ऑगॅनिक्स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट होऊन पाच किलोमीटपर्यंतचा परिसर हादरला.

३० ऑगस्ट २०१९- औषधनिर्मिती करणाऱ्या एसएनए हेल्थकेअर या कारखान्यात वायुगाळती होऊन सुपरवायझर ठार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here