सिंधुदुर्ग – उद्धव ठाकरे यांची ताकद असती तर आज पन्नास आमदार व बारा खासदार उद्धव ठाकरे यांना सोडुन गेले नसते आशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांचे डोके नासलेले आहे त्यामुळे त्यांच्या डोक्यातून तसेच विचार बाहेर पडणार भास्कर जाधव पागल झालेला कुत्राच चावलेला आहे त्यामुळे त्यांचा मेंदू सडलेला आहे अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईतील बीकेसी मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांजवळ बोलत होते.
शिवसेनेत मला ५२ वर्षे झाली मी कालचा पाहूणा नाही आता उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी मधून भाडयाने आणलेल्या लोकांना नेते व उपनेते बनवुन आमच्या अंगावर सोडण्याचा जो प्रयत्न केला जातोय या सगळ्याची उत्तरे मेळाव्यात मिळतील असाही ईशारा रामदासभाई कदम यांनी दिला आहे.
कोण भास्कर जाधव?काल राष्ट्रवादीमधून आलेला भास्कर जाधव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसून शरद पवारांकडे गेला व पुन्हा पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा आला असा हा बाटगा बाटगा अधीक कडवा असतो ना त्यामुळे उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी बोलणार आशीही टीका भास्कर जाधव यांच्यावर रामदासभाई कदम यांनी केली आहे.
दसरा मेळाव्याला खाजगी बसेस ट्रेन मधुन लोक मोठया प्रमाणात येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करणार का? असे विचारता ते म्हणाले की शक्ति प्रदर्शन असा विषय नाही,पण शिवसेना का फुटली?का दोन भाग झाले?दोन मेळावे घ्यावे लागतायत या सगळ्याची उत्तरे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात निश्चितपणे मिळतील असा ईशारा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदासभाई कदम यांनी दिला आहे.