तार सत्तरी येथील ज्ञानसागर विद्यामंदीराच्या चिमुकल्यानी धबधाब्यावर जावून पावसाळी सहलीचा आनंद लुटला. ह्यावेळी त्यांच्यासोबत पालक, शिक्षक आणी व्यवस्थापक सदस्यही उपस्थित होते. भर पावसात कोसळण्याऱ्या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता. लहान मुलांसमवेत पालक, शिक्षक व इतर मंडळीही पावसात भिजण्याचा पुरेपुर आनंद लुटला. जंगलातल्या धबधब्यावर चालत जात असताना वेगवेगळ्या झाडांची, पक्षांची, फुलपाखरांची माहिती शिक्षकांनी मुलांना करून दिली.
तार सत्तरी येथील ज्ञानसागर विद्यामंदीर मुलांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच त्यांच्या अवती भोवतीच्या निसर्गाची गोडी आणी माहिती मुलांना व्हावी ह्या हेतूने असे उपक्रम राबवत असते. आजकाल मुलांना शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानच दिले जाते मात्र ज्ञानसागर विद्या मंदीरात मुलांना निसर्ग, कला, क्रिडा ह्याचासकट परिपुर्ण शिक्षणाचा आनंद लुटता येतो ह्याचे पालकानी समाधान व्यक्त केले.



