जि. पं. निवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा राज्यभर दौरा

0
299

 

पणजी : 22 मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे उद्यापासून राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत 14 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 11 दरम्यान बेतकी-खांडोळा, 11 ते 1 दरम्यान वेलिंग-प्रियोळ, 2.30 ते 5 दरम्यान शिरोडा, सायंकाळी 5.30 ते 8 दरम्यान बोरी आणि रात्री 8.30 ते 10.30 दरम्यान कुर्टी-खांडेपार मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
15 मार्च रोजी सकाळी 9 ते 10.30 दरम्यान तोरसे, सकाळी 10.30 ते दुपारी 12 दरम्यान धारगळ, दुपारी 12.30 ते 3 दरम्यान हरमल, दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान मोरजी, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान शिवोली आणि रात्री 8.30 ते 11 दरम्यान सुकूर मतदारसंघात मुख्यमंत्री भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
16 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान मुख्यमंत्री खोर्ली मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान अस्नोडा/नास्नोडा-मोयरा, सायंकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान शिरसई आणि रात्री 8 ते 11 दरम्यान लाटंबार्से मतदारसंघातील प्रचारसभांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.
17 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 11 दरम्यान मुख्यमंत्री दक्षिण गोव्यातील सावर्डे मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत. त्यानंतर 11.30 ते 2 दरम्यान धारबांदोडा, दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 दरम्यान दवर्ली, सायंकाळी 6.30 ते रात्री 9 दरम्यान गिरडोली मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. 18 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 1 दरम्यान रिवण, दुपारी 3. ते 4.30 दरम्यान बार्से, सायंकाळी 5 ते 6.30 दरम्यान खोला, रात्री 7 ते 10 दरम्यान पैंगीण मतदारसंघात मुख्यमंत्री प्रचारसभा घेणार आहेत.
19 मार्च रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12 दरम्यान हणजुणे, दुपारी 12 ते 2 दरम्यान पेन्ह-द-फ्रान्स, दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 दरम्यान रेईश मागूश, सायंकाळी 5.30 ते 8 दरम्यान कोलवाळे आणि रात्री 8.30 ते 10 दरम्यान कळंगुट मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेही जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. 13 मार्च रोजी तानावडे सकाळी 11 ते 2 दरम्यान मडगावमधील कार्यालयात भाजपच्या प्रभारींची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 ते 5 दरम्यान ते गिरडोली मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत.
14 मार्च रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 दरम्यान तानावडे पाळी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार असून दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान शिवोली/हणजुणे, सायंकाळी 6.30 ते 9 दरम्यान रेईश मागूश आणि रात्री 9.30 ते 11 दरम्यान कळंगुटमधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये हजेरी लावणार आहेत.
15 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान तानावडे पेन्ह-द-फ्रान्स, सकाळी 11.30 ते दुपारी 2 दरम्यान सुकूर, दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 दरम्यान हळदोणे, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान शिरसई आणि रात्री 8.30 ते 11 दरम्यान कोलवाळ मतदारसंघात तानावडे यांचा दौरा होणार आहेत.
16 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान ताळगाव, 11.30 ते दुपारी 2 दरम्यान सांताक्रूझ, दुपारी 3 ते सायंकाळी 5 दरम्यान चिंबल, 5.30 ते रात्री 8 दरम्यान बेतकी-खांडोळा, तर 8.30 ते 10 दरम्यान वेलिंग-प्रियोळ मतदारसंघात तानावडे यांचा दौरा होणार आहे.
17 रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान कुर्टी-खांडेपार, 11.30 ते दुपारी 2 दरम्यान बोरी, 3 ते सायंकाळी 5.30 दरम्यान शिरोडा आणि 7.30 ते रात्री 10 दरम्यान खोर्ली मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारसभांना तानावडे हजेरी लावणार आहेत.
18 रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान उसगाव, दुपारी 12 ते 2 दरम्यान नगरगाव, दुपारी 3 ते सायंकाळी 5 दरम्यान सर्वण-कारापूर, सायंकाळी 5.30 ते रात्री 8 दरम्यान लाटंबार्से आणि 8.30 ते 11 दरम्यान मये येथील उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये तानावडे मार्गदर्शन करणार आहेत.
19 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान सावर्डे, दुपारी 12.30 ते अडीच दरम्यान धारबांदोडा, सायंकाळी 4 ते 6 दरम्यान रिवण आणि रात्री 7.30 ते 10 दरम्यान दवर्ली मतदारसंघातील प्रचारसभांना तानावडे हजर असणार आहेत.
20 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान र्पैगीण आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 दरम्यान बार्से/खोला मतदारसंघांतील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार तानावडे करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here