गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गतील मुलांना यापुढे प्रवेश नाही

0
666

 

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनेक मुले गोव्यात अडकली असली तरी यापुढे गोवा किंवा इतर जिल्हय़ातून सिंधुदुर्गात एकालाही प्रवेश दिला जाणार नाही. गोव्यात अडकलेल्या मुलांना मदत करण्यासाठी गोवा सरकारला कळविण्यात आले असून सावंतवाडी प्रातांधिकाऱयांमार्फतही मदत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या सीमा सील केल्या आहेत. अशा परिस्थितीतही काही व्यक्ती जिल्हय़ात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे यापुढे चालणार नाही. या जिल्हय़ातील व्यक्ती जिथे कुठे आहेत किंवा इतर जिल्हा किंवा राज्यातील व्यक्ती इथे असतील तर त्यांनी आहे तिथेच थांबले पाहिजे. प्रत्येक सरकार त्यांची काळजी घेत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातून कामाला जाणारी मुले गोव्यामध्ये अडकली असली तरी त्यांना यापुढे प्रवेश मिळणार नाही. इतर जिल्हय़ातून येणाऱयांनाही प्रवेश मिळणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱयांनाच ये-जा करण्यासाठी प्रवेश मिळणार आहे.

गोवा सरकारशी बोलणे

गोवा राज्यात अडकलेल्या मुलांना प्रवेश दिला जात नसला तरी त्यांची काळजी घेण्यात येत आहे. गोवा सरकारशी याबाबत बोलणे झाले असून जिथे मुले आहेत, त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत मिळणार आहे. तसेच आपल्या शासनाकडून मदत पोच करण्याची व्यवस्था केली आहे. गोव्यातील मुलांना आवश्यक मदत देण्यासाठी सावंतवाडी प्रांताधिकारी व तहसीलदारांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रांताधिकारी त्यांच्यापर्यंत मदत दिली जाणार आहे.

इतर राज्यातील कामगार सिंधुदुर्गात आहेत, त्यांनाही बाहेर सोडले जाणार नाही. त्यांच्याही पालनपोषणाची व्यवस्था जिल्हय़ात केलेली आहे. त्यामुळे जिल्हय़ात येण्याचा आणि बाहेर जाण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here