गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा रद्द होण्यास भाजपचा नाकर्तेपणा कारणीभूत : गोवा फॉरवर्ड

0
288

 

मडगाव : गोव्यातील पुर्वनियोजीत राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा अखेर रद्द झाल्याने गोवा फॉरवर्डने टीका केली असून भाजप सरकारचा नाकर्तेपणा त्याला कारणीभुत असल्याचे म्हटले आहे.

ही स्पर्धा भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने गुजरात राज्याला बहाल केल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी सरकारावर टिकेची झोड उठवली आहे. मोहनदास लोलयेकर म्हणाले की 2008 वर्षापासुन गोवा या स्पर्धा आयोजित करण्याची तयारी करीत होता. स्व. पर्रीकर यांच्या मुख्यमंत्री काळातही गोव्यात लुसोफोनिया क्रिडा स्पर्धांचे आयोजन झाले. मात्र ते केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यानंतर गोव्यात राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा आयोजनाच्या तयारीला सुरुंग लागला.

विधानसभेत सरकारने सांगितल्या प्रमाणे या खेळाच्या साधन सुविधांसाठी अंदाजे 450 कोटी रुपया खर्च झाला. या स्पर्धा रद्द झाल्याने हा खर्च वाया जाणार आहे अशी भिती लोलयेकर यानी व्यक्त केली.

क्रिडामंत्री गोविंद गावडे यानी आयओएकडे स्पर्धा आयोजनासाठी सहा महिन्यांती मुदत मागवली होती. मग दहा वर्षात भाजप सरकार कसली तयारी करीत होता हा प्रश्र्न ही उपस्थित होतोच असे लोलयेकर म्हणाले. गोव्यात फिफा अंडर 19 महिलांची व्हर्ल्ड कप  फुटबॉल स्पर्धा होणार आहे व सरकार या स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. याचाच अर्थ असा होतो की क्रिडा मंत्री जो स्वताला राष्ट्रवादाचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा असे स्वताला मानतो, तो राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेपेक्षा ए्का खाजगी स्पर्धेला प्राधान्य देत आहे अशी टिका लोलयेकर यानी केली.

गोव्यातील राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा रद्द हा तमाम क्रिडा प्रेमी गोमंतकीयांवर अन्याय आहे. शिवाय जे गोमंतकीय क्रिडापटू या स्पर्धेसाठी तयारी करीत होते त्यांचा अपेक्षाभंग झाला असल्याचे ते म्हणाले.

शिवाय एक दशक वाट पाहिल्यावर यातील काही क्रिडापटूंची अशा स्पर्धेत भाग घेण्याचे वय व त्यामुळे जीद्द व उत्साह संपलेला असेल असेही लोलयेकर म्हणाले.

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेकडे दुर्लक्ष करुन राष्ट्रविरोधी निर्णय घेतल्याबद्दल  गोवा फॉरवर्ड पक्ष भाजप सरकारचा निषेध करते असे लोलयेकर शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here