दोन दिवसापूर्वीच रेव्होलुशनरी गोवन्सने राज्यातील अनेक सरकारी कार्यालयांना , ज्यामध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पोलिस स्थानके, डायरेक्टरेट ऑफ पंचायत व इतर कार्यालयामध्ये तक्रार करून, रस्त्यारस्त्यावर बेकायदा फुलविक्री, फळविक्री व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांवर कार्यवाही करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. थोड्या फार अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही केली . परंतु फोंडा, बार्देश तालुक्यात मात्र अशा बेकायदा परप्रांतीय विक्रेत्यांवर कार्यवाही केली नाही.
बार्देश तालुक्यातील आर.जी.पी. टीम ने याबाबत म्हापसा येथील पोलिस अधिक्षकांची भेट घेवून सर्व माहिती दिली. त्याच बरोबर त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची विनंती सुद्धा केली. आज राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवा तसेच नवीन नवीन कृषी धोरणे राबविण्याची भाषा करते, परंतु यशस्वी रित्या फुल. तसेच फळं भाज्यांचे उत्पादन करणाऱ्याना बाजार उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरलेले असून, हे सरकार फक्त परप्रांतियांनाच प्रोत्साहन देत असल्याचा आरोप उत्तर गोवा आर.जी.पक्षाचे अध्यक्ष गौरेश मांद्रेकर यांनी केला.
गोव्यात प्रत्येक सणासुदीला लाखो करोडो रुपयांची. उलाढाल होते. परंतु त्याचा फायदा गोवेकराना नाही तर परप्रांतीयांना होतो. कर्नाटक तसेच इतर शेजारील राज्यातील हेच व्यापारी गोवेकराना शिव्या देतात, दादागिरी करतात आणि शेवटी गोवेकर त्यांच्याकडूनच वस्तू विकत घेतो. हे अत्यंत दुःखदायक असून गोवेकरानी गोवेकरानच्या वस्तू विकत घ्याव्या असे आव्हाहन आर.जी.सदस्यांनी यावेळी केले आहे.