कोरोनाबाबत गोव्याची परिस्थिती विनाशाकडे जाण्यापूर्वी, आंतरराज्य रेलसेवा सरकारने तातडीने बंद करावी आणि गोव्याच्या महाराष्ट्र व कर्नाटक सीमा गंभीरतापूर्वक सील कराव्यात अशी निकडीची मागणी गोवा सुरक्षा मंच ने केली आहे.
ग्रीन झोन दर्जा कमावणार्या गोव्यातील कोरोना-रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जाऊन आज सकाळपर्यंत तिने 42 आकडा पार केला असून रविवारनंतरची 22 वरून 42 पर्यंतची ही झेप गंभीर व असाधारण आहे.
गोव्याच्या या झपाट्याच्या, रेड झोनच्या दिशेने चाललेल्या या घातक अधोगति कारणीभूत, केवळ सरकार चे दिशाहीन व ” पाॅप्युलिस्ट ” धोरण,नियोजनातील अपयश, वारंवार बदलणारी भूमिका,व मंत्रीमंडळातील योग्य समन्वयाचा अभाव कारणीभूत आहे आसे गो.सु.मं.चे म्हणणे आहे.
गोव्याच्या सीमा,वाहतुकीसाठी पूर्णपणे सील केलेल्या आहेत असे सांगून सरकार जनतेची फसवणूक करीत आहे.
पोळे,पत्रादेवी,दोडामार्ग,केरी- बेळगाव या सीमांवर फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे .त्याचे व्हिडीयोही समोर आले आहेत. परिस्थितीवर सरकारचे नियंत्रण नाही.
दुसरा मोठा धोका साठलेल्या खनिजमालाच्या वाहतुकीस दिलेली परवानगी. खनिजवाहू शेकडो ट्रकांची आंतरराज्य वाहतूक , काटेकोर तपासणी यंत्रणा नसल्याने, गोव्यासाठी घातक ठरू लागली आहे.काही ठिकाणी, गडबडीचा फायदा उठवून नवीन उत्खनन सुरू केल्याच्या स्थानिक तक्रारी आहेत.
परप्रांतीय कामगारांना घरी परत पाठविण्यामागचे वा त्यांना सुरळीत अन्नपुरवठा करण्यात सरकारचे अपयश स्वयंसिद्ध आहे.
रेल्वेबंदी व राज्य-सीमाबंदी आता तरी कसोशीने करावी व संभाव्य नाश टाळावा ही मागणी.



