केपें- केपें तालुक्यातील गोकुल्डे बार्से येथील सरकारी प्राथमीक शाळेचे मुख्याध्यप श्रीधर अडणेकर यांना शाळेच्या पालक-शिक्षक संघ, माजी विद्यार्थी आणि नागरिकातर्फे भावपूर्ण निरोप देण्यात आला. जुलय 2001 साली शिक्षक म्हणून या शाळेत ते रुजू झाले होते. 23 वर्षे एकाच शाळेत सेवा बजावल्यानंतर 31 ऑगस्ट 2024 रोजी श्री अडणेकर निवृत्त झाले.
एक मनमिळावू स्वभावाचे व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्याची दखल घेऊन निवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या निरोप समारंभाला केपेंचे भाग शिक्षण अधिकारी विठोबा शिरोडकर, भाग शिक्षण अधिकारी (प्रशासन) शैला सावंत, दयानंद बांदोडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक गोविंद वेळीप, स्थानीक पंच सदस्या श्वेता वेळीप, शिक्षक निलेश वेळीप, पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा संजना गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील मुलांना 23 वर्षे विद्यादान करताना श्री अडणेकर यांनी गावातली लोकांकडे स्नेहाचे नाते जपले. त्यांच्या या निवृत्तीच्या समारंभा वेळी माजी विद्यार्थी व गावातील लोकांना अश्रू आवरता आले नाही.
या वेळी बोलताना श्री अडणेकर यांनी गोकुल्डे गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी 23 वर्षात दिलेले प्रेम याची आठवण करताना, आपण या गावचा मानस पुत्र आहे असे उद्गार काडले.
भाग शिक्षण अधिकारी श्री शिरोडकर व श्रीमती सावंत यांनी शिक्षक श्री अडणेकर यांच्या कार्याची प्रशंसा करताना शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक कसा असावा याचे ते एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक गोविंद वेळीप यांनी श्री अडणेकर हे हुशार व वेळेचे शिस्त पाळणारे शिक्षक होते असे सांगताना प्राथमीक शाळेतील मुलांवर संस्कार घडवण्याचे काम प्रमाणिकपणे केल्याचे नमूद केले.
पत्रकार सोयरू वेळीप यांनी श्री अडणेकर यांचा गावातली दोन पिळग्या घडविण्यात मोलाचे योगदान असेल्याचे सांगताना ते एक आदर्श शिक्षक असलेल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखऊन दिले आहे असे म्हटले.
शिक्षिका दक्षल पागी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका सुशिला नाईक यांनी स्वागत केले तर शिक्षक रमेश वेळीप यांनी आभार मानले.