गॅसचा तुटवडा नाही तर मग रेशनवर केरोसिन का देता? भास्कर जाधवांचा फडणवीसांना आणि भाजपला थेट सवाल

0
7

रत्नागिरी : एकीकडे देशात पुन्हा एकदा कोरोनासारखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते असा स्पष्ट इशारा स्वतः देशाचे पंतप्रधान देत आहेत, तर दुसरीकडे राज्यात मात्र कशाचाही तुटवडा नसल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. पण वास्तवात चित्र अगदी वेगळे आहे. अनेक ठिकाणचे पेट्रोल-डिझेल पंप इंधनाअभावी बंद अवस्थेत आहेत आणि एलपीजी गॅसचा सर्वसामान्यांना मोठा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता रेशनवर पुन्हा केरोसिन देण्याची घोषणा केली आहे. या सर्व परिस्थितीवरून ठाकरे गटाचे आक्रमक आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अफवा पसरवण्याच्या बाबतीत भाजपचा कुणीही हात धरू शकत नाही. सुदैवाने, सध्याच्या एलपीजी गॅस टंचाईला तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असा आरोप अजूनतरी भाजपने केलेला नाही, याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो,” असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
राज्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या अभूतपूर्व टंचाईवरून भास्कर जाधव यांनी केंद्र व राज्य सरकारवर जहरी टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here