बनारसच्या अनिलकुमारने चित्रमय केली सायंबाची वाडी
त्याच्या कुंचल्याच्या जादुई करामती मुळे गाव सारा जागा झाला कारण जणू त्या गावातील भिंतीचित्र बोलू लागली होती जलसंधारण जनजागृतीचे महत्व संपूर्ण सायंबांची वाडी चित्रमय झाल्याने सर्वांचे लक्ष वाडी कडे लागले होते आड बाजूला असलेल्या व दुर्लक्षित अशा या चित्रमयवाडी ला बघयला दूरवरून लोक येऊ लागले होते जो तो त्या चित्रकाराचीचीच चर्चा करू लागला असा अवलिया कलाकार आहे तरी कोण तर हा मुळचा उत्तर प्रदेशातील बनारसी बाबू अनिलकुमार हा युवक दीड हजार किलोमीटर हून पाणी फौंडेशन च्या माध्यमातून दुष्काळ असलेल्या बारामती तालुक्यातील सायंबाची वाडीला आला होता दिल्लीच्या आर्त कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केलेल्या अनिलकुमाराला दिग्गज अभिनेते आमिरखान यांची प्रेरणा मिळाली होती थेंब थेब पाण्याचा हा मानव विकास करिता जपला गेला पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून त्याने गेली दोन महिने वाडीतील घरनं घर शाळांचे व्हरांडे शासकीय इमारती च्या भिंती न भिंत जलसंधारण जनजागृती म्हणून पाण्याचे महत्व रेखाटून लोकांना संदेश देताना पाहवयास मिळतो या कामात गावातील सरपंच उद्योजक कार्यकर्ते आणि महिला पुरुष हि त्याला साथ देताना दिसून येतात जल है तो कल है ! ते आपला परिसर आणि स्वच्छता अशा विवध विषयावर चित्र अगदी बोलकी वाटतात सर्वसामान्य माणसाना आपलीच प्रतिमा पाणी आणि झाडाचे महत्व दाखवताना पहिले कि त्यांना खूप अभिमान वाटतो अनिलकुमार कुमारच्या या जादुई करामतीने आम्हाला पाण्याचे महत्व समजले आहे अशी कबुली हि गावकरी देतात अनिलकुमारने आपल्या कला कौशल्यातून अगदी टाकाऊ कपड्याच्या रंगसंगतीच्या चिंध्यातून हुबेहूब अशा महात्मा गांधीजी छत्रपती शिवाजी महाराजान सारख्या महापुरुषांच्या प्रतिमा तर पाणी फौंडेशनचे प्रवर्तक आमिरखान ,पोपटराव तावरे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही प्रतिमा साखरल्या आहेत विनामोबदला या कलेसेवेचा प्रवास केवळ जल जागृती आणि हरित क्रांती घडवण्या करिता अखेरपर्यंत चालू ठेवणार असल्याचे अनिलकुमार सांगतो.
(सौजन्य : www.sahajshikshan.com)