गणेश चतुर्थीला येणाऱ्या चाकरमान्यांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार

0
331

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नागरिक तसेच चाकरमान्यांच्या तपासणीसाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर १ ऑगस्ट पासून महसूल, पोलिस आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त पथके तैनात करण्यात येत आहेत आणि ज्या व्यक्ती संशयित आढळतील अशांच्या कोरोना रॅपिड टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिली.

गणेशोत्सव २२ ऑगस्ट रोजी येत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. गणेशोत्सव कालावधीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत त्यामुळे सद्यस्थितीत जी नियमावली आहे त्यानुसारच जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. नव्याने सूचना आल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लॉकडाऊन मध्ये शिथिलता न झाल्यास सद्यस्थितीत असेलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांची अंमलबजावणी करताना चाकरमानी आणि स्थानिक ग्राम नियंत्रण समित्या मध्ये वाद होणार नाहीत याचीही दक्षता घेतली जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव कालावधी मध्ये दीड लाख चाकरमानी येतील असा अंदाज आहे त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याचं पार्श्वभूमीवर खारेपाटण सह जिल्ह्याची प्रवेशद्वार असलेल्या चेक नाक्यावर महसूल ,पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त पथके ठेवली जाणार आहेत. त्याठिकाणी संशयित वाटणाऱ्या म्हणजेच कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांची प्राथमीक आरोग्य तपासणी करून स्वाब टेस्टिंगला पाठवले जाणार आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्या साडेतीनशे पर्यत गेली तरी बरे होणाऱ्या रूग्णाचेही प्रमाण चागले आहे कोव्हिडं सेंटरची आपण स्वता प्रत्यक्ष पाहणी केली असून त्याठिकाणी रुग्णांशी संवादही साधला असता चागल्या प्रकारे उपचार होत असल्याचे त्यांनी सांगितले. जेवणही चांगले मिळत असल्याचे रूग्णांनी सांगितले. त्यामुळे रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण चांगले असले तरी सुद्धा गणेशोत्सव काळात रुग्ण संख्या वाढली तर त्याच्यावर अवशोधपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिडं सेंटर मध्ये २१५ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच आवश्यकता भासल्यास तालुक्याच्या ठिकाणीही व्यवस्था केली जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण जिल्ह्यात प्राशकीय यंत्रणा चागले काम करतच आहे. सरपंच व ग्राम नियंत्रण समित्या चागले काम करीत आहे त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवता आले आता गणेशोत्सव कालावधी मध्येही सर्वांकडून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे जिल्ह्यातील जनतेने व चाकरमानी यांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. गेल्या चार महिन्यात महसूल पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा यांनी अतिशय चांगला समन्वय ठेवून काम काम केला त्याच पद्धतीने गणेशोत्सव काळात समन्वय ठेवून कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे जिल्हाधीकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here