गणेशोत्सवात चाकरमान्यांना विनापास येण्यास परवानगी नाही

0
260

 

सिंधुदुर्ग – गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी पासची आवश्यकता असून विनापास कुणालाही कोकणात येता येणार नसल्याची माहितीकोकणातील जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या मुंबईहून येणाऱया चाकरमान्यांच्या कशेडी घाटात रांगा लागल्या असून घाटात वादाचे प्रसंग घडत आहेत. रविवारी खेड येथे खोटा पास असलेल्या वाहनाला देखील पकडण्यात आले आहे. मात्र सध्या तरी विनापास कोकणातील जिल्ह्यात येण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नसल्याची माहिती येथील जिल्हा प्रशासनाने दिली.

गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना रविवारपासून कोकणात मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांच्या गाडय़ांची गर्दी सुरू झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर विनापास जिह्यात प्रवेश करणाऱया वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत, मात्र अजूनही शासनाकडून चाकरमान्यांसंदर्भात कोणतीही नियमावली स्पष्ट करण्यात आलेली नाही. यामुळे याविषयी चाकरमान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटे पास दाखवून जिह्यात प्रवेश करू पाहणाऱयांवर प्रशासनाकडून रविवारी कारवाई करण्यात आली. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here