गणपती चित्र शाळेत मुर्तीकारांची मुर्त्यांवरशेवटचा हातफिरविण्याची लगबग सुरू

0
387

सिंधुदुर्ग – कोकणातला गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला असताना गणपती चित्र शाळेत मुर्तीकारांची लगबग सुरू आहे. गेले महीनाभर मुर्ती घडवण्याच काम करत असणारे मुर्तीकार बाप्पांवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. तळकोकणात शाडूमातीच्या पर्यावरण पुरक अशा मुर्त्या जास्त प्रमाणात बनवल्या जातात तर अनेक रंगांनी रंगवलेल्या सुबक मुर्त्याना जास्त मागणी असते. यंदा कोरोनाच सावट असल्यामुळे गणपतीच्या मूर्तीची उंची कमी करण्यात आली आहे. तसेच गणपतीला नेण्यासाठी लोकांचीएकत्र गर्दी होऊनये यासाठी दोन दिवस अगोदरच पुर्ण रंगकाम करून मुर्त्या तयार ठेवण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाचा फटका कोकणातील या मूर्तिकारांनाही बसला आहे. कारण यंदा शाडू माती तसेच रंग साहित्याच्या किंमतीत किमान १५ टक्के वाढ झाली आहे. परिणामी जास्त भावाने गणेश भक्तांना मुर्त्या खरेदी कराव्या लागणार आहेत.

कुडाळ तालुक्यात कडावल परिसरात अनेक मूर्तीशाळा आहेत. गणेशोत्सव आता नजीक आल्याने या मूर्तीशाळांमधली लगबग वाढली आहे. बहुतेक शांळामध्ये गणेशाच्या मूर्ती बनवून पूर्ण झाल्या असून या मूर्तीना रंग देण्याचे काम जोरदार सुरू आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच असल्याने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी येथील कारागिर रात्रंदिवस मेहनत करत आहेत. ओरोस खुर्द येथील तुकाराम मेस्त्री, अनंत मेस्त्री व दिवाकर मेस्त्री हे गेल्या कित्येक वर्षांपासून गावात गणेश मूर्तीशाळा चालवत आहेत. मेस्त्री बंधूनी या वर्षीपासून कडावल येथेही दुसरी मूर्तीशाळा नव्याने सुरू केली आहे. या शाळेत अनेक सुबक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. मूर्तींची कमीतकमी किंमत एक हजार रूपये ठेवली आहे.

मेस्त्री बंधूंपैकी अनंत मेस्त्री यांची भेट घेवून त्यांना या व्यवसायासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, गणेश मूर्ती बनविणे हे फार जबाबदारीचे काम आहे. ते वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याने संबंधित मूर्तीकारांना वेळेचे भान ठेवावे लागते. साहित्याच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे मूर्तींची किंमतही नाईलाजास्तव वाढवावी लागत आहे. लॉकडाउनमुळे यंदा मूर्तीकामाच्या रंगसाहित्यात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. शाडू मातीच्या ४० किलोच्या गोणीची किंमत गतसाली २५० रुपये होती. ती यंदा ३०० रुपयांवर पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here