सिंधुदुर्ग – कोकण रेल्वे मार्गावर खास गणेशोत्सवाकरीत सोडण्यात आलेल्या दोन गाड्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. या दोन्ही गाड्यातून मिळून २४ प्रवासी सावंतवाडीत उतरले असून यात २ गोव्यातील व १ आजरा येथील आहे.तर अन्य प्रवाशी सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील आहे.यातील केवळ एका प्रवाशाने आपली कोविड टेस्ट केली असून अन्य २० प्रवाशांनी कोविड टेस्ट केली नसल्याचे तेथील उपस्थित आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे .तसेच ज्यांच्या टेस्ट झाल्या नाहीत त्यांना ग्रामपंचायतीच्या परवानगीनुसार गावात पाठविण्यात आले आहे . या दोन्ही गाड्या मुंबईच्या दिशेने गेल्या असून त्यातून एकूण तीस प्रवाशी मुंबईला गेले आहेत . सावंतवाडी रोड स्थानकावर आरोग्य विभागाच्या वतीने दोन पथके तैनात करण्यात आली असून प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग द्वारे टेस्ट करून हमी पत्रानुसार सोडण्यात येत आहे. याठिकाणी महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित आहेत.तसेच कोकणातील गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडूनही चाकरमान्यानी कोकणात येण्यासाठी तसा प्रतिसाद दिसत नाही.



