बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी पहाटे 1.44 वाजता ठेवलेला एक साधा, पण अंतर्मुख करणारा मोबाईल स्टेटस सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. विधानभवनातील सभागृहात लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर झळकणारा एक फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवत त्यावर केवळ “Heartbreaking” असे दोन शब्द लिहिले आहेत.
या स्टेटसमध्ये कोणतेही राजकीय वक्तव्य, आरोप किंवा स्पष्टीकरण नसले तरी त्यातून व्यक्त होणारी भावना अनेकांना अस्वस्थ करून गेली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती, माणुसकी आणि वैयक्तिक वेदना यांचा स्पर्श या दोन शब्दांतून जाणवत असल्याची प्रतिक्रिया नागरिक आणि समर्थकांकडून उमटत आहे.
पवार कुटुंबातील राजकीय मतभेदांनंतर हा स्टेटस केवळ राजकीय नसून वैयक्तिक भावनिक व्यक्तीकरण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. कधी कधी मौनच सर्वाधिक बोलकं ठरतं, आणि सुप्रिया सुळे यांच्या या स्टेटसमधून तोच अनुभव अनेकांनी घेतला आहे.



