खासदार नारायण राणेंच्या लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर होणार उपचार;

0
326

 

सिंधुदुर्ग – खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये एका स्वतंत्र इमारतीत ५० बेडच्या कोविड कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.त्याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.सोमवार २१ सप्टेंबर पासून हा कक्ष सुरू होणार आहे.त्यामुळे आता कोविडच्या रुग्णांवर अत्याधुनिक सेवा सुविधांसह उपचार मिळणार आहेत.प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र सुविधा असणाऱ्या या कक्षात एक्सरे,सिटीस्कॅन,ब्लड आणि युरिन टेस्ट अशा सुविधा स्वतंत्र उपलब्ध केल्या आहेत, हॉस्पिटलमधील इतर रुग्ण सेवा आणि कोविड रुग्ण सेवा पूर्णतः वेगवेगळी केलेली आहे.त्यासाठी २४ तास डॉक्टर आणि नर्स नियुक्त केले आहेत अशी माहिती लाईफ टाईम हॉस्पिटलचे वैदयकीय संचालक डॉ.आर.एस.कुलकर्णी यांनी दिली.
लाईफ टाईमच्या या सशुल्क कोविड कक्षात प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र स्पेशल रूम असणार आहे.त्यात स्वतंत्र ऑक्सिजन व्यवस्था,स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम आहेत.तर डॉक्टर, नर्स,वर्डबॉय, व इतर कर्मचारी फक्त याच कक्षात काम गरणार आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी काम दिले जाणार नाही.इंडियन कौंसिल ने घालून दिलेल्या नियमानुसार या ठिकाणी सर्व सेवा सुविधा दिल्या जाणार असून कोविड रुग्णाने वापरलेल्या वस्तूं जबाबदारी ने डिसपोझ करण्याची व्यवस्था केली आहे.कोरोना संसर्गात घेतल्या जाणाऱ्या सर्वप्रकारच्या शक्यतांची काळजी आपण घेत आहेत अशी माहिती डॉ.आर.एस.कुलकर्णी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here