खासदारांच्या मुलाला सत्तेचा माज- परशुराम उपरकर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन:जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचा मुजोरपणा वाढलाय

0
196

 

सिंधुदुर्ग – कणकवली मुख्य चौकात वाहतूक पोलीस श्री.परब यांच्याशी वादावादी खासदारांचा मुलगा गितेश राऊत यांनी केली.पोलिसांना शिवीगाळ करत पावसात सेवा बजावत असताना त्रास देण्याचा प्रयत्न केला.खासदारांच्या मुलाला सत्तेचा माज आल्याचा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरुरकर, मेघन सरगळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात शिवसेना सत्ताधारी मुजोरपणा करत आहेत.अनेक घटना पुढे येत आहेत.त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना जनता जास्त काळ सहन करणार नाही,असे परशुराम उपरकर यांनी सांगितले. कणकवली उड्डाण पूल संरक्षण भिंत कोसळली.या घटनेची पाहणी मुख्य अभियंता देशमाने व श्री .गोरे यांनी कुणालाही कल्पना न देता का केली? हा अहवाल देणारे पालकमंत्री यांच्याच खात्याचे असल्याचा टोला उपरकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here