सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुडाळ कुपवडे येथे धाड टाकून एका शिका-याला अटक केली आहे. स्वप्नील परब या शिका-याने त्याच्या राहत्या घराच्या मागील बाजूच्या पडवीत दोन बंदूका व खवले मांजराची खवले लपवून ठेवलेली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला याची माहीती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे.
आरोपी कडून मिळालेला मुद्देमाल-
२५००० रुपये किमतीची सिंगल बॅरल काडतुसची बंदूक, १०,०००/- सिंगल बॅरल ठासणीची बंदूक, ६००/- ४ जिवंत काडतुसे,१२ किलो ९३० ग्रॅम खवले मांजराची खवले.व इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खवले मांजराची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते,सध्या कोकणातही त्याचे प्रमाण अधिक वाढू लागले आहेत.वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत ही प्रजाती अनुसूची १ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांत त्याची शिकार करून खवले विकले जातात.यावर नियंत्रण आणण्यासाठी याच्या संरक्ष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
खवले मांजराला जीवाला धोका असतो त्यावेळी तेव्हा स्वतःच्या शरीराचा चेंडू करून घेते.खवल्यांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी असते.हा प्राणी जगलं भागात आढळतो.ग्रामीण भागातील लोकांना त्याचे जगलातील ठिकाणे माहिती असतात.स्थानिकांना पैसेच आमिष दाखवून खवले माजरांची शिकार केली जाते.
जगभरात खवले मांजराच्या एकूण आठ प्रजाती आहेत. त्यातील चार आशियाई देशांमध्ये सापडतात. भारतामध्ये भारतीय खवले मांजर आणि चिनी खवलेमांजर अशा दोन प्रजाती आढळतात. याची शिकार प्रामुख्याने कोकणात अधिक होते.
हा प्राणी बिळात राहत असल्याने तसेच रात्रीच फिरत असल्याने त्याचा जागतिक पातळीवरही आत्तापर्यंत फारसा अभ्यास झालेला नाही.