कोरोना रिकव्हरीत सिंधुदुर्ग जिल्हा अग्रेसर

0
324

 

सिंधुदुर्ग – जिल्हा कोरोना रिकव्हरी रेटमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 59.67 टक्‍के एवढा आहे. रिकव्हरी रेटमध्ये गोंदिया जिल्हा 83.41 टक्केसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. बाधित 229 पैकी 191 रुग्ण बरे झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाधित 279 पैकी 240 रुग्ण बरे झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 80.14 टक्केसह अकोला जिल्हा असून 2 हजार 49 पैकी 1 हजार 642 रुग्ण बरे झाले आहेत. नजिकचा रत्नागिरी जिल्हा बाराव्या क्रमांकावर आहे. या जिल्ह्यात 1 हजार 195 पैकी 713 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची रिकव्हरी टक्केवारी 59.67 एवढी आहे.

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 59 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 16 कोरोनाबाधित आणि 26 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 10 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 7 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. दरम्यान, आज जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील 2 हजार 996 व्यक्तिची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील संस्थात्मक क्‍वारंटाइनमध्ये 463 व्यक्ति वाढल्याने येथे 14 हजार 821 व्यक्ति दाखल राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 2 व्यक्ति कमी झाल्याने येथील संख्या 50 झाली आहे. गाव पातळीवरिल संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 416 वाढल्याने येथील संख्या 11 हजार 771 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 49 व्यक्ति वाढल्या असून येथील संख्या 3 हजार झाली आहे. तर गेल्या 3 दिवसांत नव्याने 4 हजार 826 व्यक्ति जिल्ह्यात दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या 1 लाख 41 हजार 787 झाली आहे.

कुडाळ येथील आदर्श पार्क, हिंदू कॉलनी येथे 100 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. याच तालुक्‍यातील पावशी येथील मिटक्‍याचीवाडी येथे 500 मीटरचा परिसर आणि ओरोस येथील मेस्त्रीवाडी येथील 500 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. या तिन्ही कंटेन्मेंट झोनमध्ये 1 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here