सिंधुदुर्ग – कोरोना रोगाच्या तसेच भविष्यातील जैविक युद्ध नियंत्रणासाठी, मेडिकल वॉरियर म्हणजे आपत्कालीन वैद्यकिय योद्धा संकल्पनेची गरज असून कोरोना महामारीसारख्या काळात रोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित माणसांची दुसरी फळी आवश्यक असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर तर्फे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे प्रकल्प सादर केल्यानंतर ही संकल्पना महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या आरोग्य धोरणाचा भाग बनविण्याच्या दृष्टिकोनातून, माहिती देण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांनी मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत अशाप्रकारच्या इमर्जन्सी मेडिकल वॉरियरची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य शासनाकडे या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याची विनंती डॉ. रेडकर यांनी केली. त्याला श्री. फडणवीस उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माजी मुख्यमंत्री खास.नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रमेश पाटील, आम. भाई गिरकर, आम. नीतेश राणे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या संकल्पनेबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर उपस्थित होते.
सध्या दीड लाख चाकरमानी कोकणात येत आहेत. जर कोविड पेशंटचा आकडा असाच वाढत राहिला तर जिल्ह्याची शासकीय व प्रायव्हेट अशा दोन्ही यंत्रणा कोसळून पडण्याची भीती डॉ. फॅटर्निटी क्लब आय एम ए या ॲथोराईज मेडिकल संघटनेने शासनाला वारंवार दिली आहे . देशात आज फ्रंटलाईन डॉक्टर्स च आजारी किंवा मृत्युमुखी पडत आहेत. सेकंड लाईन इमर्जन्सी वॉरियर्स, इस्पितळे व यंत्रसामुग्री तयार न ठेवल्यास तो अत्यंत घातकी व दूरदर्शी पणाचा अभाव ठरेल. रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे डॉ. सागर रेडकर यांच्या नेतृत्वाखाली धारगळ येथील हॉस्पिटलची कोरोना व्हक्सिन संशोधनासाठी भारताच्या १२ हॉस्पिटल पैकी एक अत्याधुनिक हॉस्पिटल म्हणून ICMR मान्यतापात्र निवड झाली आहे. येत्या दोन वर्षात डॉ. सागर रेडकर व डॉ. विवेक रेडकर यांनी आठ देशात जाऊन आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंध सादर केले आहेत. त्याचा संशोधना मधील म्हणण्याप्रमाणे खेड्यातील खऱ्या भारतीय जनतेवर संशोधन नाममात्र होते असे त्यांना वाटते. त्यांच्या अनुभवाप्रमाणे “ EMERGENCY MEDICAL WARRIORS ” हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांनी आयुषमंत्री यांच्याबरोबर समन्वय साधून चर्चा करावी. राजकारण बाजूला ठेऊन त्यात सुधारणा करून तो प्रत्यक्षात आणावा अशी विनंती डॉ. रेडकर हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांनी केले आहे.



