कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी कोकण रेल्वेची १ कोटी ८५ लाखांची मदत

0
232

 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोकण रेल्वेनेही मदतीचा हात पुढे केला आहे. कोकण रेल्वेच्या सीएसआर फंडातून आणि कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगारातून एकूण १ कोटी ८५ लाखांचा निधी पंतप्रधान सहायता निधीत जमा करण्यात येणार आहेत. यात सीएसआर फंडातून १ कोटी सहा लाख तर कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचा पगार ७९ लाख ५० हजार रुपये, अशी रक्कम सहायता निधीत जमा केली जाणार आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अनेक मदतीचे हात आता पुढे येत आहेत. अनेक उद्योगपतींनी सामाजिक भान दाखवत मदत देऊ केली आहे. दरम्यान, कोकण रेल्वेनेही कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे. कोकण रेल्वेच्या सीएसआर फंडातून १ कोटी सहा लाख तर कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या मूलभूत वेतनातून ७९ लाख ५० हजार रुपये, तसेच कोकण रेल्वेचे कर्मचारीदेखील वैयक्तिकरित्या आपला एक दिवसांचा पगार देणार आहेत. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here