सिंधुदुर्ग – मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला असला, तरीही मोसमी वार्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ धडकून त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मोसमी वारे दाखल होतील आणि 17 जूननंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, मोसमी पावसाची सुरुवात मात्र संथ गतीने सुरू झाली आहे.
सध्या मोसमी वार्यामध्ये जोर नाही. 17 जूननंतर मोसमी वारे दाखल होऊन मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. यंदा उशिराने दाखल झालेला मान्सून अखेर आता सक्रीय होण्याच्या तयारीत आहे. पुढील काही तासांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि 50 ते 60 कि.मी. प्रतितास वेग असलेल्या सोसाट्याच्या वारा असेल. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशाही सूचना प्रशासनांनी दिल्या आहेत.