सिंधुदुर्ग – मासिक ऋग्वेद प्रकाशन आजरा यांनी एक लेखक एक साहित्यप्रकार याअंतर्गत प्रकाशित केलेल्या लेखिका कल्पना मलये लिखित सई या सुट्टी विशेषांकाचे प्रकाशन सन्मा संजना सावंत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
लहान मुलांना नेहमीच आपल्या भवतालाशी एकरूप होणारे लेखन आवडत असते.कल्पना मलये यांची सई कोकणच्या भवतालातील आहे. सामान्य असणारी ही बालनायिका प्रत्येक वाचकाला आवडेल. अत्यंत सोप्या सरळ भाषेतील हे लिखाण शाळा शाळांमधील विद्यार्थ्यांमधे वाचनाची गोडी निर्माण करेल.असे प्रशोंसोद्गार यावेळी सन्मा संजना सावंत यावेळी काढले.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सदर प्रकाशन सोहळा अत्यंत साधेपणाने करण्यात आला.यावेळी लेखिका कल्पना मलये, छोटी सई उपस्थित होत्या.
कल्पना मलये यांचे लेखन नेहमीच बालकांसाठी अनुभव विश्व खुले करणारे असते. असे नितीन कदम जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी शुभेच्छा देताना सांगितले.तर शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांनी शुभेच्छापर संदेशात म्हटले आहे की , “सई विशेषांकानंतर सई पुस्तकरूपात येण्याची उत्सुकता वाढली आहे.” ” सई ही बालनायिका अवखळ,निरागस, असून तिला सतत प्रश्न पडतात.तिचे भावविश्व, तिचे अनुभव विश्व लेखिका कल्पना मलये यांनी अचूक शब्दात चितारले असून मराठीतील ही बालनायिका निश्चितच बालमनाचा ठाव घेईल.”अशा शुभेच्छा तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बालसाहित्यिकांमधे कल्पना मलये यांचं नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. कल्पना मलये यांची तळागाळातल्या आणि शेवटच्या माणसांची कविता हृदयाचा ठाव घेते. आपल्या अनेक कवितांमधून त्यांनी अल्प शब्दात खूप मोठा आशय दिलेला आहे . ऋग्वेद मासिकाने काढलेला त्यांचा *कारटो* खूप वाचनीय ठरला.आत्ता त्यांची ऋग्वेद मासिकातर्फेच *सई* आपल्या भेटीस येत आहे. तीसुद्धा नक्कीच वाचनीय आहे. त्यांचा
*अक्षरदोस्ती* हा छोट्यांसाठी लिहिलेला चारोळी संग्रह शालेय मुलांना अभ्यासात खूपच महत्त्वाचा ठरला.हा संग्रह फारच वाचनीय ठरला. त्यांच्या *सई* चं आता प्रकाशन होतेय. त्यांना पुढील वाटचालीस आणि लेखनास खूप खूप शुभेच्छा.अशा शब्दात कवी प्रा मोहन कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदर प्रकाशन सोहळ्याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ,सचिव सुशांत मर्गज,संचालक आनंद तांबे, संपर्क प्रमुख प्रशांत बोभाटे,राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप मांजरेकर , यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.शाळा कणकवली क्र ५ चे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रा .अच्युत देसाई यांनी कल्पना मलये यांचे विशेष अभिनंदन केले असून लेखनकार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.निवेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेदक राजेश कदम यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की कल्पना मलये या उपक्रमशील शिक्षिका असून त्यांनी लहान मुलांसाठी केलेले लेखन देखील वाचन संस्कृतीचा विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवून केलेले आहे बालकांमध्येे त्यांची पुस्तके अल्पावधीतच लोकप्रिय होतील.
मासिक ऋग्वेद हे बालकांचे,पालकांचे, हक्काचे मासिक असून, नवनवीन प्रयोगांद्वारे वाचन चळवळ मुलांमधे रूजावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते.यापूर्वी कारटो विशेषांकाद्वारे कल्पना मलये यांचा मालवणी नायक प्रकाशित केला आहे.तसेच पुस्तक रूपातील कारटोदेखील लवकरच येत आहे.कल्पना मलये यांनी संपादक सुभाष विभूते,चित्रकार योगिता धोटे,लेखक फारूक काझी ,मासिक ऋग्वेद टीमचे आभार मानले आहेत.