रेव्हलुशनरी गोवसचे सांत आंद्रेतील आमदार राज्यात सध्या विविध मतदारसंघात जावून लोकांच्या अडचणी जाणून घेत आहे. कालच ते काणकोण मतदारसंघात गेले असता त्यांनी गावणे धरणाला भेट दिली. जवळ जवळ हे धरण बांधून सतरा वर्षे झाली तरीही त्या पाण्याचा पुरवठा लोकांना केला जात नसल्याचे दिसून आले. सुमारे ७० कोटी रुपयाचा हा सरकारचा प्रकल्प असून, लोकांसाठी ह्या धरणाचा आजपर्यंत काहीच फायदा झाला नसल्याचे बोरकर म्हणाले.
काणकोण मतदारसंघातील अनेक गावे अशी आहे जिथे पाण्याचे भयंकर संकट आहे. खोतीगाव, गावडोंगरी सारख्या गावांनी एक घागर पाण्यासाठी लोकांना रोज चार पाच किलोमीटरचा पायी प्रवास करून आणावे लागत आहे. लोकांचे पाण्यासाठी भयंकर हाल होत आहेत. आतापर्यंत सरकारने ह्या धरणाला इतका निधी खर्चून सुद्धा लोकांना पाणी मिळत नाही. डबल इंजिन सरकारचे हर घर जल, प्रशासन तुमच्या दारी, अंत्योदय तत्व कुठे गेले आहे असा प्रश्न विरेश बोरकर यांनी केला आहे.
अजुन पर्यंत ह्या धरणाचा पाणी पुरवठा का केला नाही आहे ते राज्य सरकारने जनतेला सांगावे. सभापती रमेश तवडकर हे सुद्धा काणकोण मतदारसंघाचे असुन ते सुद्धा इतक्या वर्षांचा हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले असून हे राज्यातील डब्बल इंजिन सरकार पूर्ण पणे लोकांची दिशाभूल करत असल्याचे विरेष बोरकर म्हणाले.