काजू उद्योगाबाबत महाराष्ट्र सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

0
208

सिंधुदुर्ग – महाराष्ट्रातील काजू उद्योगाला 2.5 टक्के एसजीएसटी परतावा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. याबाबतचा जीआर आठवड्यात निघणार असल्याची महिती महाराष्ट्र कॅशु मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अदिती तटकरे, चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्यासमवेत महाराष्ट्र कॅश्‍यू मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपीन वरसकर, कमिटी पदाधिकारी दयानंद काणेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली.

यावेळी महाराष्ट्र काजू उद्योगाला 2.5 टक्के परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेत महाराष्ट्रातील काजू उद्योग, शेतकरी यांच्या काजू बी दरामध्ये काजू हमीभावाबद्दलही चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले. 5 टक्के व्याज सवलतीबद्दल कॅबिनेट बैठकीत ठराव पास करून निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार जास्त प्रयत्नशील राहतील असा अंदाज त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.

आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे या झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय झाले, अशी माहिती अध्यक्ष बोवलेकर यांनी देत ही चर्चा कोरोनाच्या कालावधीत सुद्धा घडवून आणून निर्णय घेतल्याबद्दल आमदार पाटील, उपमुख्यमंत्री पवार, उद्योगमंत्री देसाई, अदिती तटकरे तसेच जीएसटी कमिशन, विक्रीकर आयुक्त, उद्योग कार्यालयीत अधिकारी यांचे असोसिएशनच्यावतीने आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here