कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आज सकाळी वार्घुमे आणि वळवई भागाला भेट देऊन मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरसदृश्य परिस्थितीची पाहणी केली.गावडे यांनी सरकारी यंत्रणेला परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना करून लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.