कणकवलीत राणे विरुद्ध सेना बॅनर वॉर शिवसेनेचा ” दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा ” बॅनर ठरतोय लक्षवेधी

0
185

सिंधुदुर्ग – केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज रात्री कणकवलीत दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नरडवे फाट्यावरील शिवसेना शाखेवर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा शाब्बास रे माझ्या वाघानो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा या आशयाचे बॅनर लावून राणेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात दाखल होत असून यानिमित्ताने सेना विरुद्ध राणे असे बॅनर वॉर कणकवली शहरात बघावयास मिळत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंना उद्योगमंत्री पद मिळाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यानी दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशा आशयाचे बॅनर लावून राणेंचे अभिनंदन केले.

सिंधुदुर्गात येत असलेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागतालाही भाजपा कार्यकर्त्यानी त्याच आशयाचे बॅनर लावले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राणेंना जनआशीर्वाद यात्रा सुरू असतानाच अटक झाली होती. त्यामुळे राणेंची जनआशीर्वाद यात्रा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली.

राणेंना झालेली अटक आणि सुटका यानंतर कणकवलीत राणेंचे आज आगमन होत असतानाच शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शाब्बास रे माझ्या वाघांनो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा या आशयाचे बॅनर लावून राणेंना डीवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा कणकवली शहरात रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here