सिंधुदुर्ग – कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत आज दुपारी कोसळलीआहे. ही भिंत पहिल्याच पावसात खचली होती.
पाऊस सुरू झाल्यापासून कणकवली एस. एम. हायस्कूल समोरील उड्डाणपूल धोकादायक बनल्याची माहिती प्रशासनाला होती. अनेकदा बैठका व नेत्याचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतली नाही. परिणामी सोमवारी दुपारी संरक्षण भिंत कोसळल्याने सर्विस रस्त्यावर माती आली आहे.सुदैवाने जीवदानी ठळली आहे. भविष्यात आणखी संरक्षण भिंत कोसळून दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती काळताच आमदार नितेश राणे, शिवसेना नेते संदेश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह कणकवली कराणी घटनास्थळी धाव घेतली.



